जळगावात आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी

Viral news live
By -
0

 


(अतिक खान जळगांव)

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मालकीच्या जळगावातील शिवराम नगर परिसरातील बंगल्यात चोरट्यांनी चोरी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या चोरीबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 घटनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !