मलकापुर:- तालुक्यातील विवरा येथे 26 सप्टेंबर 25 रोजी अतिवृष्टी होवून ढगफुटी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे घराचे अतोनात नुकसान झाले त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सह पालकमंत्री सावकारे आ.चैनसुख संचेती तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट दिली मंत्री महोदयांनी विवरा येथील शेतकऱ्यांना,रहीवासी ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला होता महिना उलटून सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांना व रहिवासी ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर 25 रोजी तहसील कार्यालयासमोर डफडेबजाव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकारी व रहिवासी ग्रामस्थांना तहसीलदार यांना दि.27 ऑक्टोबर 25 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की अतिवृष्टीमुळे ज्या शंभर ते दिडशे शेतकऱ्यांचे बांध फुटून जमीन खरडून गेली काही शेतकऱ्यांचे पाईप व ठिबक सिंचन वाहून गेले त्यांना शासनाच्या निकषांप्रमाणे भरपाई मिळावी, अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी ज्या दहा ते अकरा शेतकऱ्यांच्या विहिरीत घुसून विहिरी खचल्या त्यांना शंभर टक्के अनुदानाच्या विहिरी देण्यात याव्यात, अतिवृष्टीमुळे नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावरच राहील असे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरीदास गणबास,उपशहरप्रमुख शकील जमादार,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, विभाग प्रमुख सत्तार शाह,दिलीप निकम,मुकूंदा बोरले, मुरलीधर कडू,शे. मोहसीन शे. छोटू, जावेद खान सह आदींच्या सह्या नमूद आहेत.
विवरा येथील अतिवृष्टी धारकांना नुकसान भरपाई मिळण्साठी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा)चे डफडे बजाओ आंदोलन
By -
29.10.25
0
Tags:

