पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

Viral news live
By -
0
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून “स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम” नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करून त्यांना सुरक्षित आणि जबाबदार गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणे हे होते.


या कार्यक्रमासाठी सेबी रिसोर्स पर्सन श्री. अभिजित प्रभाकर चिने यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी “स्मार्ट इन्व्हेस्टमेंट” म्हणजे शहाणपणाची गुंतवणूक कशी करावी, बाजारातील जोखमींचे व्यवस्थापन कसे करावे, म्युच्युअल फंड्स व शेअर बाजाराचे मूलभूत ज्ञान याबाबत अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दीपक ए. झोपे यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. ए. लांडे यांनी प्रभावीपणे पार पाडले. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहकारी प्राध्यापक वृंद प्रा. राधिका बिहाडे, प्रा. भाग्यश्री नारखेडे, प्रा. श्रीकृष्ण बोंबटकर, प्रा. योगेश पाटील आणि प्रा. ख्याती चौधरी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, तसेच आयक्युएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विभागप्रमुख प्रा. नितीन खर्चे यांनी विद्यार्थ्यांना बाजारपेठेतील आर्थिक संधींचा योग्य अभ्यास करून गुंतवणुकीचे सुयोग्य निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते व सर्व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य यांनी अभिनंदन व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा उपयुक्त उपक्रमांना नेहमीच पाठबळ देण्याची ग्वाही दिली. संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्राद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !