![]() |
डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक सत्र संपन्न |
मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे विद्यार्थ्यांसाठी “डिझास्टर मॅनेजमेंट अँड फर्स्ट एड अवेअरनेस” या विषयावर एक उपयुक्त शैक्षणिक सत्र नुकतेच आयोजित करण्यात आले. या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णयक्षमता व तत्परतेने मदत करण्याची वृत्ती विकसित करणे हा होता. सत्रात विद्यार्थ्यांना डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत माहिती देण्यात आली, ज्यामध्ये आपत्तीच्या वेळी शांतता राखून त्वरित मदत कशी करावी, सुरक्षिततेची पावले कोणती घ्यावीत, आणि आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व काय आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच सॉफ्ट टिश्यू इंज्युरी संदर्भात जखमांचे प्रकार, त्यांची चिन्हे व लक्षणे, तसेच पी-एच-टी म्हणजेच रुग्णालयात नेण्यापूर्वी द्यावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पुढे मस्क्युलोस्केलेटल इंज्युरी म्हणजे हाडे, सांधे व स्नायूंवरील दुखापती याविषयी सखोल चर्चा करण्यात आली आणि अशा वेळी योग्य हाताळणी, प्राथमिक उपचार, तसेच रुग्णाच्या सुरक्षित हालचालीसंबंधी तंत्र समजावून सांगण्यात आले.
यानंतर स्नेक अँड डॉग बाईट या विषयावरही माहिती देण्यात आली. सर्पदंश किंवा कुत्र्याच्या चावण्याच्या प्रसंगी लोकांमध्ये असणाऱ्या गैरसमजांवर चर्चा करून योग्य प्रथमोपचार पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना अशा आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता शास्त्रशुद्ध व सुरक्षित उपाययोजना कशा करायच्या हे शिकण्याची संधी मिळाली. संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत चर्चेत मोलाची भर घातली.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व संयोजन प्रो. पी. बी. पट्ठे, प्रो. व्ही. एस. चोपडे, प्रो. ए. आर. गोळे आणि प्रो. एस. एम. बोरले सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन, डॉ. युगेश खर्चे आणि आय-क्यू-ए-सी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे सत्र अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक उपचार आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात प्रत्यक्ष आयुष्यात अशा प्रसंगी तत्परतेने कार्य करण्याची आत्मविश्वासपूर्ण तयारी त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. असे प्रतिपादन व्यवस्थापक मंडळाचे खजिनदार श्री सुधीर पाचपांडे, सदस्य श्री अनिल इंगळे, श्री पराग पाटील व डॉ. गौरव कोलते यांनी केले