![]() |
अल्पसंख्यांक मोर्चा पदाधिकाऱ्यांना जमाल भाई सिद्दीकी यांचे मार्गदर्शन |
जळगाव, (अतीक खान)भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने जिल्हा बैठक व पत्रकार परिषद भाजपा कार्यालय, जी.एम. फाउंडेशन, जळगाव येथे दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडली.
या बैठकीत भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा हज कमिटीचे चेअरमन (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) मा. ना. जमाल भाई सिद्दीकी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्षविस्तारासाठी तळागाळात कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अस्लम साहेब, प्रदेश उपाध्यक्ष व हज कमिटी संचालक मा. सलीम बागवान साहेब, तसेच जिल्हा अध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी आणि महानगर अध्यक्ष दीपक भाऊ सुरवन्सी उपस्थित होते.
यावेळी जमाल भाई सिद्दीकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष ऍड. साहेबज शेख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य जहांगीर ए. खान यांनी केले होते.
या वेळी प्रदेश, जिल्हा आणि महानगर कार्यकारिणी पदाधिकारी, जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थितांमध्ये उदय भालेराव, धीरज वर्मा, अ. रऊफ शेख, याकूब खान, अकबर काकर, आसिफ शेख, ईद्रीस शेख, वसीम शेख, जमील शेख, वसीम पटेल, रहीम शेख (जामनेर), शब्बीर अली सय्यद, अफसर शेख, रज्जाक खान, अनिस शेख, नासिर शेख आदी मान्यवरांचा समावेश होता.