![]() |
मुक्ताईनगर येथील मुस्लिम मनियार बिरादरीत आदर्श विवाह — लग्न ठरवायलाच आले आणि लग्न लावून गेले... |
संदीप जोगी... मुक्ताईनगर
मुक्ताईनगर येथील मुस्लिम मनियार बिरादरीत साधेपणाने आणि अल्प खर्चात आदर्श विवाह पार पाडण्यात आला. सविस्तर वृत असे की, मुक्ताईनगर येथील सिड फार्म भागातील रहिवाशी एम आई एम पार्टी चे तालुका अध्यक्ष शेख मुस्ताक शेख मुसा मनियार यांची मोठी मुलगी तंजिला बी शेख मुश्ताक मनियार याचा विवाह भादली ता. जळगांव येथील शेख जावेद शेख जब्बार याच्या सोबत झाला व मुश्ताक मनियार यांची लहानी मुलगी बीबी फातिमा शेख मुश्ताक याचा विवाह मुक्ताईनगर येथील रहिवाशी शेख सोहेल शेख रशीद याच्या सोबत झाला यात विशेष म्हणजे दोघी वरपक्ष चे लोक एकमेकांना भेटण्यासाठी आले आणि त्याच ठिकाणी कोणताही जेवण न करता आलेले सर्व पाहुणे मंडळीला फक्त सरबत पाजून सर्वांच्या संमतीने लग्न लावून दिले गेले.या प्रसंगी सुन्नी मनियार मस्जिद चे मौलाना मुबाशीर अहमद यांच्या हस्ते निकाह संपन्न झाला.यात उपस्थित सर्व मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात वाढत्या दिखाव्याला आणि खर्चिक लग्नांना आळा बसावा, या हेतूने हा विवाह आदर्श ठरला आहे.
वर–वधू आणि दोन्ही परिवारांनी अल्प खर्चात, मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, साध्या पद्धतीने विवाह केल्याने समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.यात जळगांव जिल्हा मनियार बिरादरी चे जिल्हा अध्यक्ष फारुख शेख यांनी वधू चे वडीलांना फोन करून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमास शेख हनीफ शेख गुलाम दस्तगीर भादली, शेख शरीफ शेख सुपडू हिंगोणा, शेख वासिम शेख मजीद अडावद, शेख साबीर शेख मजीद अडावद, शेख रशीद राजनी वाले, शेख इसरार अहमद शेख अमीर नगरदेवळा, हाफिज इकबाल मनियार, शेख अयुब शेख लतिफ जारगाव सारोळा, तसेच मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, सुन्नी मनियार मस्जिद चे मुतवाली कलीम मनियार, खजिनदार अहमद ठेकेदार, अब्दुल रफीक मणियार, हाजी उखर्डु मेहमूद, हाजी गुलाम महमूद, एम आई एम चे बाबा ठेकदार, सईद खान, अनिस मेकॅनिकल आदी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, नातेवाईक, मित्रपरिवार व मुक्ताईनगर एमआईएम पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी नवविवाहित दांपत्यास उज्ज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.