![]() |
रामरोटी आश्रमाच्या सेवाभावी कार्यांना १८ वर्षे पूर्ण |
मुक्ताईनगर (अतीक खान)
संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर या भूमीत गेली अखंड १८ वर्षे मानवसेवेचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प. पु. गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा यांच्या रामरोटी आश्रमाने ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून अनेक उपक्रम राबवले आहेत.
या सेवाभावी परंपरेत सातत्य ठेवत यंदाही आश्रमाच्या वतीने दिवाळी निमित्त समाजातील वंचित, निराधार घटकांना किराणा साहित्य, फराळ, व कपड्यांचे वाटप करण्यात आले. नमकीन चिवडा, सोनपापडी, गहू, तांदूळ, साखर, तेल, तूप, रवा, मैदा, खोबरे, चहापत्ती, दाळी, मसाले, बिस्किट पुडे, साबण, पावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
"एक हात से दिया हुआ दान, हजारो हातों से लौटकर आता है" या भावनेतून समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या दानशूर दात्यांचा या कार्यात मोलाचा सहभाग राहिला.
कार्यक्रमाचे आयोजन रामरोटी आश्रम आणि दानशूर दाते यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आश्रमाचे आधारस्तंभ असलेले –
डॉ. एन. जी. मराठे (ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ, गायत्री हॉस्पिटल)
श्री पुरुषोत्तमभाऊ वंजारी
श्री हकिमभाऊ आर. चौधरी (राम रहीम चेंबर)
श्री संदीपभाऊ खरे (गणेश झेरॉक्स)
कै. गयाबाई निकम यांच्या स्मरणार्थ श्री जगदीशभाऊ निकम (साई डेअरी)
डॉ. गणेश माधव येवले (नाशिक)
श्री प्रदीपभाऊ चौधरी (बँक अधिकारी)
श्री अनिरुद्ध गोपाळ महाजन (ठाणे)
श्री मनोजभाऊ भुजंगराव देशमुख
श्री प्रदीपभाऊ पुंडलिक निळे (अप्पा)
या सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
रामरोटी सेवक परिवार व सर्व दानदाते यांचे मनःपूर्वक आभार मानत, हि मानव सेवा निरंतर घडत राहो आणि गुरुकृपा सदैव सर्वांच्या पाठीशी राहो, अशी प्रार्थना करण्यात आली.
जय मुक्ताई! 🚩
– रामरोटी सेवक परिवार, मुक्ताई