![]() |
मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी नव्याने सोडत ईश्वरचिट्ठीने काढण्यात आली. |
संदीप जोगी मुक्ताईनगर ...... मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत महिला आरक्षण चुकल्याची बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.२० रोजी सकाळी ११ वाजता नव्याने आरक्षण सोडत तहसीलदारांच्या दालनामध्ये काढण्यात आली. प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, महसूल कर्मचारी किरण बावस्कर, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. ईश्वरी संदीप झांबरे या पाच वर्षीय मुलीचे हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात सहा गणांचा समावेश आहे. त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार अंतुर्ली गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग, उचंदेत सर्वसाधारण, कुन्हे गणात अनुसूचित जाती (महिला), वेळोदे अनुसूचित जमाती, हरताळे व रुईखेडा गण सर्वसाधारण (महिला) संवर्गासाठी आरक्षित करण्यात आला होता. यापूर्वीच्या सोडतीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी गण राखीव नसल्याने रोटेशनच्या क्रमानुसार प्रक्रिया चुकीची झाल्याची बाब प्रशासनाच्या ध्यानात आली होती. त्यामुळे ही बाब राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली होती. त्यानुसार आयोगा नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे या सोडतीतील रोटेशन पद्धतीने या तालुक्यातील एक गण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील नव्याने निघालेले गणाचे आरक्षण असे...
35-अंतुर्ली ...नागरीकांचा मागास प्रवर्ग
36-उचंदे .....सर्वसाधारण (स्त्री)
37-कुऱ्हे....अनुसूचित जाती (स्त्री)
38-वढोदे....अनुसूचित जमाती (स्त्री)
39-हरताळे....सर्वसाधारण
40-रुइखेडे.....सर्वसाधारण.
निघालेल्या आरक्षणामुळे निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची नाराजी झालेली असून नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे यावरून दिसून येत आहे.