मलकापुर:- शिवसेना (उबाठा) मलकापूर येथील जिल्हा संपर्क कार्यालयास आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन भाऊ वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने सह आदिंची उपस्थिती होती. शिवसेना जनसंपर्क कार्यालय सदिच्छा भेट दिल्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास सह आदी पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख प्रा. खेडेकर यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, युवा सेना शहर प्रमुख मंगेश सातव, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह, शिवसेना ज.जामोद उपशहरप्रमुख चाॅद कुरेशी, राहुल गणबास,अनंता सातव सह आदींची उपस्थिती होती.
शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्क कार्यालयास संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर यांची सदिच्छा भेट
By -
25.10.25
0
Tags:

