अहिल्यानगर नंदकुमार बगाडे पाटील : “मोठमोठे डीजे नको, साधेपणाने वाढदिवस साजरा करावा” – ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांचे प्रतिपादन

Viral news live
By -
0
अहिल्यानगर नंदकुमार बगाडे पाटील :  “मोठमोठे डीजे नको, साधेपणाने वाढदिवस साजरा करावा” – ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर (अतिक खान) – समाजातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पुढारी यांनी आपले वाढदिवस साध्या पद्धतीने साजरे करावेत, असा संदेश अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांनी दिला.

बगाडे पाटील यांनी पुढे सांगितले की, "मोठमोठे डीजे, फटाके, आणि दिखावा न करता, वाढदिवसाचा खर्च अनाथ, निराधार, अंध-अपंग आश्रमातील मुलांवर करावा. या मुलांना अन्नदान, कपडे, शालेय साहित्य यांचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंद साजरा करावा."

त्यांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे — जो पितो तो गर्जतो. समाजातील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घ्यावी.

बगाडे पाटील यांचा ७५ वा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त केक न कापता लहान मुलांना खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली गेली. यावर्षी त्यांचा वाढदिवस आणि दीपावलीचा सण एकाच दिवशी आल्याने आनंद द्विगुणित झाला.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य पोपटराव पठारे, पोपटराव बागुल, अनिल सूर्यवंशी, किसनराव पोपळघट, बबनराव बगाडे पाटील, स्वप्निल बागडे पाटील, प्रकाश बागडे पाटील, मोहन बाबा शिंदे, सौरव केदारी, सौ. सुमित्रा बगाडे, श्रीमती भारती केदारी, सौ. चंद्रकला बगाडे पाटील, श्रीमती कल्याणकर रोहिणी तसेच गुरुवर्य भाऊसाहेब बोबडे गायकवाड व पत्रकार मित्रमंडळ श्रीरामपूर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोपटराव पठारे यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांनी बगाडे पाटील यांच्या समाजकार्याचे कौतुक करून त्यांना पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !