मलकापूर (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या विचारधारा आणि सेवा प्रेरणेने भाऊबीज निमित्त सामाजिक बांधिलकी जपत मलकापूर शहरात गरजूंना फराळ वाटप करण्यात आले.
आज दुपारी १२ वाजता जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते व प्रहार नेते गजानन लोखंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या उपस्थितीत रेल्वे परिसर आणि कॉटन मार्केट भागातील गरिबांना शेव, चिवडा व मिठाईचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमावेळी जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, उमेश जाधव, शहर युवा अध्यक्ष करण नायसे, पत्रकार अनिल गोठी, करण धनके यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा समाजाभिमुख कार्याची परंपरा कायम ठेवली आहे.

