अपघातग्रस्तांना आमदार चंद्रकांत पाटील यांचा आधार — माणुसकीचे दर्शन घडविले
(प्रतिनिधी अतीक खान, मुक्ताईनगर)
जळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी जात असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळजवळील साकेगाव परिसरात माणुसकीचे दर्शन घडविले.
साकेगाव जवळ एका रिक्षाचा अपघात होऊन ती रस्त्यावर पलटी झाली. हा प्रसंग पाहताच आमदार पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि स्वतः गाडीतून उतरून मदतकार्य सुरू केले. त्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षेबाहेर काढत धीर दिला तसेच तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावून प्राथमिक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.