कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा युवा महोत्सव मध्ये झंझावाती सहभाग

Viral news live
By -
0
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा युवा महोत्सव मध्ये  झंझावाती सहभाग
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा युवा महोत्सव मध्ये  झंझावाती सहभाग

(संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या रंगमंचावर कोलते अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण)

मलकापूर: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व श्रीमती केशरीबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युवा महोत्सव 2025-26” हा सांस्कृतिक सोहळा हा नुकताच अमरावती येथे अत्यंत रंगतदार, कलात्मक आणि ऊर्जावान वातावरणात पार पडला. या महोत्सवात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील २५ विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, आत्मविश्वासाचा आणि कलात्मक स्फोटाचा जबरदस्त प्रत्यय देत सहभाग नोंदवला. ललित कला, रंगमंच, साहित्य, नृत्य, संगीत अशा सर्व क्षेत्रात त्यांनी झंझावाती कामगिरी सादर केली. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, संघ व्यवस्थापक प्रा. सचिन बोरले आणि महिला व्यवस्थापक प्रा. भाग्यश्री नारखेडे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.

पहिल्या दिवशी प्रा. बोरले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा, चिकट कला, स्थळ छायाचित्रण अशा कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेने परीक्षक आणि प्रेक्षक दोघेही थक्क झाले. दुसऱ्या व अंतिम दिवशी प्रा. नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली समूहगान, वादविवाद, वकृत्व, मेहंदी, रांगोळी, स्थापना कला, स्थळचित्र आणि पोस्टर मेकिंग या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक सादरीकरणात नावीन्य आणि आत्मविश्वास झळकला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण, समाजभान आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आपल्या सादरीकरणातून घडवून आणला. यामुळे उपस्थित प्रेक्षकांकडून कोलते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

या भव्य यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की  “कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ तांत्रिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही आपली छाप पाडत आहेत. अशा सहभागामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो.” प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले, “युवा महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवा प्रकाश दिला आहे. आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तंत्रज्ञानासोबतच संस्कृतीची ओळख जपतो — हीच आमची खरी ताकद आहे.”




Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !