पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक यशाने ओमप्रकाश देशमुख मंत्रमुग्ध

Viral news live
By -
0
*पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक यशाने ओमप्रकाश देशमुख मंत्रमुग्ध*
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक यशाने ओमप्रकाश देशमुख मंत्रमुग्ध


मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर ला श्रीसंत मारुती महाराज संस्थान, माकनेरचे उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश भिमरावजी देशमुखयांनी नुकतीच भेट देऊन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे सर यांची सदिच्छा भेट घेतली. श्री संत मारुती महाराज संस्थान यावर आता पर्यंत दोन पीएचडी पूर्ण झालेल्या आहेत. भेटीवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व व्यवस्थापकीय प्रगतीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. श्री. देशमुख हे केवळ माकनेर संस्थानचे अध्यक्ष नसून, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज मोताळा चे लाइफ मेंबर कॉलेज डेवलपमेंट कमिटी, तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था भामोड दर्यापूर  चे सदस्य लोकल मॅनेजमेंट कमिटी यांचे सुद्धा सदस्य आहेत. सात मागील ३१ वर्षांपासून त्यांनी समाजकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी साधली आहे.

भेटी दरम्यान त्यांनी महाविद्यालयाच्या गेल्या पंधरा वर्षांतील प्रगतीचा सखोल आढावा घेतला. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे सरांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास, उद्योगांसोबतची जोडणी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशाबाबत त्यांनी आपल्या मनःपूर्वक कौतुकात म्हटले, “आज मी पाहिलं की महाविद्यालयाने फक्त शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अपूर्व कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी केलेल्या कार्याचे स्वरूप अतिशय प्रेरणादायक आहे.” श्री. देशमुख यांनी महाविद्यालयाच्या भविष्यातील योजना आणि नवनवीन प्रकल्पांचे आढावा घेतला. त्यांनी प्राचार्य सरांना व व्यवस्थापक मंडळाला प्रोत्साहन देत म्हटले, “तुमच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची प्रगती नक्कीच गगनस्पर्शी होईल. या संकल्पनांनी विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल.”

श्री. देशमुख यांच्या भेटीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व सामाजिक उपक्रमांना नवा उत्साह मिळाला आहे. संत मारुती महाराज व्याख्यानमाला सध्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात चालू असून, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा महाविद्यालयाच्या विकासात सकारात्मक परिणाम दिसून येत असून, संस्था आणि समाजासाठी त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित होते. या भेटीनंतर प्राचार्य डॉ. खर्चे सर म्हणाले, “श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला महाविद्यालयाच्या आगामी प्रकल्पांसाठी आत्मविश्वास आणि दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात आम्ही सज्ज आहोत.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !