|  | 
| श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न | 
मलकापुर:- दिपावलीच्या शुभ पर्वा निमित्त बुलढाणा रोडवरील महेश अर्बन पत संस्था नजीक उभारलेल्या श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्ग नामकरण सोहळा दि.19 ऑक्टोबर 25 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ, माळवी सोनार समाज अध्यक्ष सुभाष ठोसर, मेजर नामदेवराव पाटील, अनिल गांधी,आदित्य रावळ, विनय काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.उपस्थित मान्यवरांचा समाजाचे वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी समाजातील प्रभाकर रत्नपारखी, भानुदास बुडकले, रमेश मावळे,गजानन ठोसर, मनोहर रत्नपारखी, रवींद्र रत्नपारखी, प्रदीप शुरपाटणे,पुरुषोत्तम उंबरकार, वसंत कोंदनकर , अनिल मुंधोकार, विनोद रत्नपारखी,सुरेश ठोसर, रवींद्र उंबरकर ,मधुकर रत्नपारखी, दिगंबर अनासुने,प्रवीण ठोसर राजेश ठोसर, संजय ठोसर, अलकाताई सुभाष ठोसर, गीताताई वसंत कोंदनकर, सुवर्णाबाई राजेश महाले, संजय उंबरकर, विलास तळेकर, दीपक इटणारे, प्रमोद उज्जैकार,बळीराम बावस्कर, अशोक उज्जैकार, संदीप ठोसर,योगेश बावस्कर, अमोल बगाडे,चत्तरसिंग राजपुत, उखर्डा तांदूळकर, शुभम ठोसर, सतीश ठोसर,सह सोनार समाज बांधवांची  उपस्थिती होती.

