२४ वर्षिय तरुणाचा गोराडा धरणात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू...

Viral news live
By -
0
२४ वर्षिय तरुणाचा गोराडा धरणात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू...

जळगाव जामोद प्रतिनिधी... सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील लघु प्रकल्प असलेल्या गोराळा धरणात पोहायला गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २२ ऑक्टोबर रोजी अकरा वाजेच्या सुमारास घडली. जळगाव जामोद तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील २४ वर्षीय कैलास खंडारे हा आपल्या मित्रांसह गोराळा धरण येथे पोहायला गेला होता. सकाळी नऊ वाजता सर्व मित्र गोराडा धरण परिसरात पोहोचले व कैलास हा पोहायला गोराळा धरणात खोलवर गेला सोबत असलेले मित्र पोहता येत नव्हते म्हणून काठावरच अंघोळ करत होते.कैलास धरणाच्या पाण्यात बुडत असताना त्यांना दिसला परंतु त्याला वाचवणे जमले नाही त्यामुळे कैलास धरणात बुडाला परंतु अद्यापही बाहेर निघाला नाही. स्थानिक पथक शोध कार्य करीत असताना सुद्धा तो मिळून आला नाही. उ.बा.ठा गटाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाला तात्काळ शोध मोहीम राबवा व  कैलास चा मृतदेह शोधा याकरिता गोराळा धरणावर आपले सहकारी शहर प्रमुख चांद कुरेशी, अनिल ढोकणे सह प्रशासनाच्या संपर्कात होते.मृतक कैलास खंडारे हा तरुण दिवाळीनिमित्त गावी आला होता. त्याचे पश्चात आई,वडील नसून तो एकटाच होता. या घटनेने निंभोरा बुद्रुक गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी तहसीलचे कर्मचारी, पोलीस प्रशासनातील सुनगाव बीटचे जमदार इरफान शेख, संदीप रिंढे, पोलीस पाटील पती मनीष तडवी यांचे सह सुनगाव निंबोरा बुद्रुक व परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !