कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलच्या संपादकीय मंडळावर

Viral news live
By -
0
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलच्या संपादकीय मंडळावर

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील प्रशासकीय डीन डॉ. युगेश अनिल खर्चे आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. संतोष रामा शेकोकार यांची “इंजिनिअरिंग कन्वर्जन्स अँड इनोव्हेशन (ई.सी.आय.)” या नामांकित आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलच्या संपादकीय मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालय परिवारात अत्यंत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. ही नियुक्ती “युनिव्हर्सल रिसर्च फोरम” या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेमार्फत प्रकाशित होणाऱ्या जर्नलसाठी करण्यात आली आहे.

ही नियुक्ती केवळ वैयक्तिक यश नसून, ती महाविद्यालयातील अध्यापन, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे. दोन्ही प्राध्यापकांनी आतापर्यंत संशोधन, तांत्रिक पेपर सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या प्रकल्प मार्गदर्शन आणि गुणवत्ता वृद्धी यांसारख्या विविध शैक्षणिक क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत “इंजिनिअरिंग कन्वर्जन्स अँड इनोव्हेशन” या जर्नलने त्यांना संपादकीय मंडळावर स्थान देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी दोन्ही प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “ही नियुक्ती आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असून, ती विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संशोधन क्षेत्रात अधिक प्रेरणा देणारी ठरेल. डॉ. युगेश खर्चे आणि प्रा. संतोष शेकोकार यांनी केलेले कार्य आमच्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देईल.”

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते व श्री. सुधीरभाऊ पाचपांडे तसेच व्यवस्थापन मंडळाचे इतर सदस्य यांनीही दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन केले. त्यांनी नमूद केले की या नियुक्तीमुळे पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव जागतिक शैक्षणिक क्षेत्रात अधिक तेजाने झळकणार आहे. महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.  समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे,  विभाग प्रमुख प्रा. नितीन खर्चे, प्रा. योगेश सुशीर, प्रा. सुदेश फरपट, डॉ. अमोघ माळोकर,  प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. महेश शास्त्री, प्रा. गजानन सुपे, प्रा. साकेत पाटील यांनी देखील या यशाबद्दल आनंद व्यक्त करून दोन्ही प्राध्यापकांना पुढील संशोधन आणि शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय नियुक्तीमुळे महाविद्यालयातील संशोधन संस्कृती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्वास सर्वानी व्यक्त केला आहे.
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !