अंतुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

Viral news live
By -
0
अंतुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या संपन्न
अंतुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

(अतिक खान – मुक्ताईनगर)

नवरात्रीच्या शुभ पर्वानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा मंडळ, अंतुर्ली आणि कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज नगर, अंतुर्ली येथे पार पडले.

शिबिराच्या प्रारंभी देवीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कांताई नेत्रालय, जळगाव येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.सी.एस. पद्धतीने (टाक्यांची) मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत जाण्या-येण्याची सोय, तसेच मोफत नाश्ता व जेवणाची सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली.

शिबिरात डॉ. मोहम्मद बेग, कॅम्प सुपरवायझर योगेश माळी व अभिमन्यू सर यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. तसेच ब्लड प्रेशर व शुगर तपासणी सुद्धा मोफत करण्यात आली. या शिबिरात एकूण ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १२ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आढळून आली.

या प्रसंगी भाऊराव महाजन, डी.आर. महाजन, कैलास दुट्टे, नरेंद्र दुट्टे, बाबु हुसेन, नितीन दाणी, विलास काळे, डॉ. रमेश कोळी, सुभाष दवंगे, विनायक चौधरी, मोहन बेलदार, अमोल पाटील, पवन पाटील, दीपक पालवे, देवेंद्र दाणी, चंद्रकांत पाटील धामंदे, नरेश पाटील, अनिल महाजन, विनोद कापसे, योगेश महाजन, सौरभ सोनार, संदीप महाजन, मेघराज दाणी, तुषार महाजन, तन्मय दाणी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाली असून, आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)