![]() |
शांततेत व एकोप्याने सण साजरा करण्याचे आवाहन |
(काझी अमीनुद्दीन)
बुलढाणा, दि. ५ : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी आज गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी गावात संचारबंदी लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी बावनबीर येथे ग्रामस्थांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना सण-उत्सव शांततेत, एकोप्याने आणि आपसी सद्भावनेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील दिल्या.