लोणार पोलीसांची अवैध दारु विक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही
सैय्यद वसीम| प्रतिनिधी - दिनांक 17/10/2025 च्या संध्याकाळी पोलीस स्टेशन लोणार येथील पोउपनि धनंजय इंगळे, सोबत पोहेकाँ सुधाकर गवई, पोकाँ सचीन घेवंदे व चालक पोकाँ हरीभाउ ढाकणे असे शारा बिट हददीमध्ये पेट्रोलीग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की वडगाव तेजन येथील इसम नामे प्रल्हाद मुर्कीदा पवार वय 54 वर्ष रा. वडगाव तेजन ता.लोणार जि. बुलडाणा हा वडगाव तेजन ते सुलतानपुर रोडवर त्याचे वॉलकंपाउन्डच्या अंगणात एका टपरीत दारु विक्रीकरीता आहे अशी गुप्त बातमीदारकडुन माहीती मिळाल्यावरुन सदरची माहीती ठाणेदार निमीष मेहेत्रे यांना देवुन लोणार पोलीस स्टेशनचे पोउपनि धनंजय इंगळे सोबत पोहेकाँ सुधाकर गवई, पोकाँ सचीन घवदे व चालक पोकाँ हरीभाउ ढाकणे असे ग्राम वडगात तेजन येथे जावुन दोन पंचासमक्ष प्रल्हाद मुर्कीदा पवार यांचे वॉलकंपाउंन्डमध्ये एका टपरीत विनापरवाना 200 नग देशी दारू संखु संत्रा टॅगो प्रिमीयम कंपनीच्या 90 एम एल च्या प्लॅस्टीक शिलबंद शिश्या प्रत्येकी किं अंदाजे 40/- रू असा 8000/- रूचा माल व एक वॉयरची थैली किं अंदाजे 20/- रू असा एकूण 8020/- रू चा प्रोव्ही मुददेमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन लोणार येथे अप.न.401/2025 कलम 65 (ई) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.