जन सेवा हिच ईश्वर सेवा अखंड सेवेचे २५ वे वर्ष --देविदास शर्मा
दिपावली मध्ये घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब आप आपल्या परीने दिवाळी चा आनंद साजरा करतात गोडगोड पदार्थ दिव्यांची आरास. नवीन कपडे.नव्या वस्तुंची खरेदी.असा सगळी कडे असतो परंतु गोर गरीबांना या पासून वंचित रहावे लागते अशा गोरगरीबाचा सहारा व रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांच्या ही जिवनात दिवाळी चा आनंद फुलावा या भावनेतून वंचित घटका सोबत दिवाळी चा आनंद साजरा करावा असा विचार करणारे काही थोडे लोक असतात गरीबांची जान असणारे सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे स्थानिक सतिफैल परीसरातील देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांनी सन २००० मध्ये ह- भ- प गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली व मागिल २५ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्नधान्य नाही अशा समाजातील उपेक्षित लोका प्रति आपले ही काही देन लागते हा उद्देश समोर ठेऊन अखंड पणे उपक्रम राबवत आहेत दिं २३ नोव्हेंबर २०२५ गुरूवार रोजी भाऊबीज चे औचित्य साधुन शहरातील विविध ठिकाणी जाऊन अंध.अपंग.गोरगरीबांना कपडे.महीलांना साडी. मिठाई वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली .
या प्रसंगी जेष्ठ समाज सेवक छगन दादा चुनेकर.मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे.अरूण कडवकर, दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे,सागर ठाकूर.विरल चुनेकर .विनोद ढवळे.संतोष सुकाळे.दादा ठाकूर.प्रमोद सुरंगे.शकुंतला ढवळे. जया सुकाळे. मंगला बावस्कर. संगीता वाघोळे . जयश्री झापर्डे.उज्वल सुकाळे , मानु शर्मा.व भजनी मंडळा चे सर्व सदस्य हजर होते
अशी माहिती श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली

