संत परंपरेचा संगम :..... भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे भक्तीमय सोहळा

Viral news live
By -
0

संत परंपरेचा संगम :..... भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे भक्तीमय सोहळा

संदीप जोगी.... मुक्ताईनगर  –
भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे संत परंपरेचा पावन संगम घडला. श्रीक्षेत्र आपेगाव येथून आणलेली साडी-चोळी घेऊन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर यांनी संत मुक्ताई नवीन मंदिर येथे अभिषेक करून संत मुक्ताईंस साडी-चोळी परिधान करण्यात आली.

या भक्तीमय सोहळ्यास ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. भागवत महाराज पाटील, ह.भ.प. तुषार महाराज मिसाळ, ह.भ.प. मिसाळ महाराज, ह.भ.प. राजू महाराज सावंत सर आदींसह असंख्य भाविक उपस्थित होते.

दरम्यान, संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथेही श्रीक्षेत्र आळंदी येथून आलेली साडी-चोळी अभिषेक करून संत मुक्ताईंस परिधान करण्यात आली. या पवित्र विधीप्रसंगी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्या हस्ते साडी-चोळी परिधान करण्यात आली.

यावेळी संस्थानचे व्यवस्थापक ह.भ.प. उध्दव महाराज जुनारे तसेच अनेक संतसेवक व भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

भाऊबीजच्या शुभमुहूर्तावर भक्तिभाव, परंपरा आणि संतसंस्कृतीचा संगम अनुभवत श्रीक्षेत्र मुक्ताईनगर भक्तिमय झाला.

संत परंपरेचा संगम :..... भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे भक्तीमय सोहळा

संत परंपरेचा संगम :..... भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे भक्तीमय सोहळा

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !