![]() |
जुनेद शेख यांची युवक काँग्रेस जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी नियुक्ती |
अमीनुद्दीन काजी, जळगाव जामोद प्रतिनिधी
जळगाव जामोद येथील युवा कार्यकर्ते जुनेद शेख यांची युवक काँग्रेस जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते जुनेद शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धीरज लिंगाडे आमदार अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघ बुलढाणा जिल्हा प्रभारी राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅड. भाऊराव भालेराव, माजी अध्यक्ष अविनाश उमरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, श्रीकृष्ण केदार, प्रमोद पाटील, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.