![]() |
मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट , गणातील आरक्षण सोडत जाहीर |
आरक्षण सोडत प्रसंगी एकही महिला उपस्थित नाही.
संदीप जोगी मुक्ताईनगर...
आगामी होऊ घातलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू असून. मुक्ताईनगर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषदेचे ३ गट व पंचायत समितीचे ६ गण निर्मित झालेले आहे. जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रमा नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण यामधून महिला उमेदवार यांच्या जागा निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये दुपारी १२ वाजता जिल्हा भूसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
व्यास पिठावर तहसीलदार गिरीश वखारे ,नायब तहसीलदार निकेतन वाडे , महसूल सहाय्यक किरण बावस्कर, स्वप्निल खोले उपस्थित होते. प्रसंगी इच्छुक उमेदवार तसेच नागरिक उपस्थित होते. शिवन्या पाटील या मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
काहींचे गट गण आरक्षित झाल्याने प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे तर काहींना दिलासा मिळालेला आहे. निवडणूक रिंगणामध्ये नव उमेदवार असतील अशा चर्चा आहेत. आरक्षण सोडत प्रसंगी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बोटावर मोजण्या इतके नागरिक उपस्थित होते तर एकही महिला उपस्थित नव्हती.
@@@@ असे निघाले पंचायत समिती गणाचे
आरक्षण....
अंतुर्ली.... नागरिकांचा मागास प्रवर्ग
उचंदे.... सर्वसाधारण
कुऱ्हा... अनुसूचित जाती महिला
वढोदे... अनुसूचित जमाती
हरताळे... सर्वसाधारण महिला
रुइखेडा.... सर्वसाधारण महिला
@@ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण....
अंतुर्ली... अनुसूचित जाती
हरताळे.... सर्वसाधारण
कुऱ्हा... अनुसूचित जमाती.