![]() |
मुक्ताईनगर शहरात अवैध तांदूळ साठवणुकीचा गोरखधंदा सुरू? — सुज्ञ नागरिकांमधून चर्चेला उधाण |
मुक्ताईनगर (अतिक खान )
मुक्ताईनगर शहरात अवैध तांदूळ साठवणुकीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे. गोरगरीब व गरजूंना शासनमान्य रेशन दुकानांतून तांदूळ मिळत नसताना, मात्र काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांदूळ साठवून ठेवण्यात येत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
सदर तांदूळ साठा रेशनिंग योजनेतीलच असल्याचा संशय व्यक्त होत असून, जर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली, तर मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक नागरिकांनी याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित साठवणुकीची चौकशी करावी, अशी चर्चा जनतेतून जोर धरत आहे.
शासन गरीबांच्या तोंडचा घास पोहोचावाण्या साठी विविध योजना राबवत असताना, अशा प्रकारच्या अनियमिततेमुळे शासनाच्या योजनांवरच पाणी फिरत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिक प्रशासन व अन्न व नागरी पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे