![]() |
ओबीसींना स्वतंत्र मोहीम राबवत जातीचे दाखले मिळावेत तसेच ओबीसी आरक्षणात वाढ व्हावी ओबीसी जनकल्याण संघाची मागणी |
फैजपूर (अतिक खान)
आज फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी श्री काकडे साहेब यांना ओबीसी जनकल्याण संघ चे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मायक्रो ओबीसीच्या आरक्षण वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले.
अनेक छोट्या छोट्या ओबीसीतील जातींना अजून जातीचे दाखले मिळाले नसून त्याला हैदराबाद व अन्य ज्या पद्धतीने मोहिमा राबवण्यात आल्या तशाच पद्धतीने ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना घरोघरी जातीचे दाखले उपलब्ध करून द्याव्यात त्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात तसेच आगामी लोकसभा विधानसभा विधान परिषद मध्ये ओबीसी मायक्रो ओबीसी कारागीर यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये मायक्रो ओबीसी छोट्या जातींना आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणांमध्ये वाढ करण्याची तसेच शैक्षणिक सामाजिक आरक्षणामध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी श्री प्रशांत बोरकर यांनी केली श्री प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संजय चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश महाराज ठाकरे तसेच अन्य कार्यकर्ते सोबत उपस्थित होते