मुक्ताईनगर येथील मानव अधिकार संघटने तर्फे पोलीस विभागाचे गौरव कौतुक.....
(अतिक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर येथील आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियत्रंण शाखेचे वतीने आज मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसुड व पथकाचे गौरव व सत्कार करण्यात आले.
मुक्ताईनगर शहरात मागील आठवड्यात दरोडा व चोरी चे सत्र सुरू असून शहरातील केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांचे मालकीचे पेट्रोल पंपावर दरोडा टाकून दरोडखोर यांनी रोख रक्कम लुटून पसार झाले व त्याच प्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यात अजून दोन ठिकाणी दरोडा टाकून लूटपाट करण्यात आली.
तसेच काही घरातून सोन्याचे दागिने व अनेक मोटारसायकली सुद्धा चोरी करण्यात आले. त्यामुळे मुक्ताईनगर शहरातील नागरिक त्रस्त झाले होते व पोलिस विभागावर नाराजी व्यक्त करत होते.
परंतु दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक आशिष अडसुड यांनी धडक मोहीम आखून 8 ते 9 दरोडा व चोरी करणारे यांना पकडून आणले व त्याच्या ह्या कामामुळे मुक्ताईनगर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटने कडून त्यांचे सत्कार व गौरव करण्यात आले ह्या वेळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, तसेच पथकात पी एस आय नयन पाटील, हावलदार महेंद्र सुरवाडे, पो. काॅ. रविंद्र धनगर, दिपक चौधरी, संदीप वानखेडे, गोविंद पवार, एल पी सी कावेरी जाधव आदी सत्कार केला. महिला पोलिस कॉन्स्टेबल सह आदींचे सत्कार करण्यात आले.