मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत 20 ऑक्टोबर रोजी नव्याने काढण्यात येणार

Viral news live
By -
0

मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत 20 ऑक्टोबर रोजी नव्याने काढण्यात येणार


संदीप जोगी मुक्ताईनगर..... Viral News Live
मुक्ताईनगर पंचायत समिती च्या नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सभा घेण्यात येतात.

राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर पंचायत समितीसाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली होती.तथापी, मुक्ताईनगर पंचायत समिती करीता आरक्षण सोडत काढतांना चुकीची झाल्याने आरक्षण सोडत नव्याने काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

या अनुषंगाने मुक्ताईनगर पंचायत समितीकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांनी सभास्थळी हजर रहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)