पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास भारत संचार निगम लि. चे उच्च पदाधिकारी यांची तांत्रिक भेट

Viral news live
By -
0
पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास भारत संचार निगम लि. चे उच्च पदाधिकारी यांची तांत्रिक भेट
पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयास भारत संचार निगम लि. चे उच्च पदाधिकारी यांची तांत्रिक भेट

पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे नुकतीच भारत संचार निगम लि. बी.एस.एन.एल. चे उच्च पदाधिकारी यांची वन-डे टेक्निकल व्हिजिट आयोजित करण्यात आली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, नेटवर्किंग, ट्रान्समिशन सिस्टम्स, तसेच आधुनिक तंत्रज्ञानातील प्रॅक्टिकल अनुभव देणे होता. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक या भेटीत उपस्थित होते, ज्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडून थेट मार्गदर्शन व इंडस्ट्री इन्साइट्स घेतले.

या भेटीत उपस्थित बी.एस.एन.एल. चे एन. आर. ठोबरे, ए.जी.एम. ऑपरेशनल, बुलडाणा, एस. के. बरर्फानी, जे.टी.एम., मलकापूर, एस. एस. खिल्लारे, एस. डी. ट्रान्समिशन, बुलडाणा, ए. मोसीन, एस. डी. ई., बुलडाणा, अरुण राजगुरु, जे.टी.एम., खामगाव हे वरिष्ठ अधिकारी होते. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संचार तंत्रज्ञानातील नवीन तंत्र, नेटवर्किंग प्रणाली, ट्रान्समिशन सिस्टिम्स, तसेच फील्ड वर्क आणि उद्योगातील प्रॅक्टिकल अनुभव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, इंडस्ट्री एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल कामाचे ज्ञान विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे थिओरेटिकल ज्ञान प्रॅक्टिकल अनुभवांसह सुसंगत झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी या भेटीबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना उद्योगाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि करिअर मार्गदर्शन सुनिश्चित होते, तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढते.यावेळी अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रश्न विचारून इंटरअॅक्टिव्ह सेशन चालवले, ज्यामुळे भेट अजूनही माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक बनली. अशा तांत्रिक भेटी विद्यार्थ्यांना नॉलेज मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतात. महाविद्यालय व अधिकारी यांच्यातील हा संवाद केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर शिक्षक आणि शिक्षण संस्थांसाठीही नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म ठरला. भविष्यात अशा भेटींचा सतत कार्यक्रम राबविण्याचा महाविद्यालयाने निर्धार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही ज्ञानवृद्धी व औद्योगिक अनुभव सुनिश्चित होईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील व सदस्य डॉ गौरव कोलते, अनिल इंगळे यांनी केले.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)