मुक्ताईनगर : अतिक खान::
पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. समाजबांधव तसेच युवा वर्गाकडून लखन भाऊंनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी होत आहे.
गोर-गरीब, वंचित व सर्वसामान्य समाजासाठी लखन भाऊ पानपाटील यांनी आतापर्यंत सातत्याने काम केले आहे. सामाजिक न्याय, समता आणि सेवा या विचारांवर आधारित त्यांचे कार्य पाहून जनतेत त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
लखन भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक युवक प्रेरित झाले असून, समाजातील सर्व घटकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत लखन भाऊंची उमेदवारी निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

