करंजी पाचदेवळी माजी विद्यार्थी सेवा संघाच्या अध्यक्षपदी श्री. निळकंठ पाटील यांची निवड

Viral news live
By -
0
करंजी पाचदेवळी माजी विद्यार्थी सेवा संघाच्या अध्यक्षपदी श्री. निळकंठ पाटील यांची निवड

(अतीक खान) करंजी पाचदेवळी::

करंजी पाचदेवळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, करंजी पाचदेवळी येथे आज माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच विद्यमान सरपंच श्री. नंदलाल पाटील होते.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष इंगळे यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती देत सर्वांना संघटनेच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.


सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सर्वसंमतीने खालील कार्यकारिणी निश्चित करण्यात आली:


अध्यक्ष: श्री. निळकंठ तुकाराम पाटील


उपाध्यक्ष: श्री. मिलिंद देविदास सुरवाडे


सचिव: श्री. सुभाष इंगळे सर (मुख्याध्यापक)


कोषाध्यक्ष: श्री. डीगंबर समाधान सूर्यवंशी


सल्लागार सदस्य:


1. श्री. विजय गायकवाड सर (शिक्षक)



2. श्री. अश्विन कोळी (पालक प्रतिनिधी)



3. श्री. दिनकर हरी सोनवणे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी)



4. श्री. सुपडू जयराम राऊत (सेवानिवृत्त शिक्षक)




सदस्य: सर्व माजी विद्यार्थी



सर्व नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीचे उपस्थितांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थी तथा पोलीस पाटील श्री. प्रशांत गजानन पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. स्वतःपासून पुढाकार घेत त्यांनी व त्यांच्या भावंड श्री. जीवन गजानन पाटील यांनी आपल्या आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेच्या व्हरांड्यातील सर्व फरशी बदलून नवीन फरशी बसविण्याचे जाहीर केले — ज्यासाठी अंदाजे ₹1 लाख खर्च अपेक्षित आहे.


त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी श्री. युसुफ पिंजारी आणि श्री. मिलिंद सुरवाडे यांनी शाळेला आर.ओ. फिल्टर भेट देण्याचे जाहीर केले, तर उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक योगदानातून शाळेतील संपूर्ण लाईट फिटिंग नव्याने बसविण्याचे ठरवले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. सुभाष इंगळे सर यांनी केले तर शेवटी त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळेला दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.


या वेळी श्री. सूर्यकांत चव्हाण, युवराज शेजोळे, सोपान पाटील, गोपाळ पाटील, शरद पाटील, वीरेंद्र गायकवाड, बापू पाटील, वैभव पाटील, राजेश गायकवाड, अमोल कोळी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !