जळगाव जामोद प्रतिनिधी... अमीनुद्दीन काज़ी
ऐन दिवाळीच्या दिवशी जळगाव जामोद शहरातील अयोध्या नगर येथे फटाके फोडण्याच्या किरकोळ वादावरून २६ वर्षिय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २१ ऑक्टोंबर च्या रात्री घडली असून, पोलिसांनी विनय हिरामण वय २५ वर्ष याने दिलेल्या तक्रारीवरून तिघांना अटक केली आहे. सविस्तर असे की दिनांक २१ ऑक्टोबर अर्थात दिवाळीच्या दिवशी रात्री साडेआठ वाजे दरम्यान जळगाव जामोद शहरातील अयोध्या नगर येथील अमोल हिरामण हिस्सल वय २६ वर्ष आणि त्याचा भाऊ विनय हिस्सल हे घराशेजारी उभे असतानायोगेश रामदास ताडे वय २२ वर्ष, शुभम रमेश ताडे वय २७ वर्ष आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय २७ यांनी मृतकाच्या अंगावर फटाके फेकल्याचे कारणावरुन वाद झाला... या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन यातील आरोपी योगेश रामदास ताडे याने मृतक अमोल हिस्सल याचे डोके पकडुन घरासमोरील ओटयाला मारले.. तसेच आरोपी शुभम रमेश ताडे व ज्ञानेश्वर पंडित कोथळकार यांनी मृतक अमोल हिस्सल यास लाथा बुक्क्यांनी छातीवर, पाठीवर व डोक्यावर मारहाण केली...यावेळी आरोपीने त्याचे खिशातील पेचकच काढुन मृतक अमोल हिस्सल यांचे कपाळावर मारुन त्याचा खुन केल्याची तक्रार मृतकाचा भाऊ विनय हिरामण हिस्सल यांनी जळगाव जामोद पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश रामदास ताडे वय २२ वर्ष, शुभम रमेश ताडे वय २७ वर्ष आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय २७ वर्ष या तीन आरोपींविरुद्ध
अपराध क्रमांक
४९०/२०२५ कलम १०३(१),३(५) भारतीय न्याय संहिता नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश रामदास ताडे वय २२, शुभम रमेश ताडे वय २७ व ज्ञानेश्वर पंडित कोथळकार वय २७ यांना अटक करण्यात आली आहे.ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडल्याने शहरांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे..

