मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलची चोरी
संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव वढवे शिवारामध्ये पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने रात्रीच्या वेळेस शेत शिवारामध्ये जाऊ नये असे आवाहन केले आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतामध्ये मुक्कामी थांबत नाही. त्याचा फायदा उचलत अज्ञात चोरटे यांना चांगलेच भावले असून ते शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी ला लावलेल्या केबलची चोरी करीत असल्याचे उघळ झालेले आहे. कोथळी शेतशिवारातील जवळपास आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतावरील विहिरीच्या मोटारीची केबल ची चोरी झालेले असल्याचे कोथळी चे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी सांगितले.
गेल्या महिन्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे परिसरातील 15 शेतकऱ्यांच्या शेतावरील विहिरीच्या मोटरच्या केबल चोरून नेल्याची घटना घडलेली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केलेली आहे.