मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याजवळील चंद्रोदय पेट्रोल पंपावर 1 लाख 83 हजाराची फसवणूक
दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
संदीप जोगी मुक्ताईनगर.....
मुक्ताईनगर भुसावळ महामार्ग वरील हरताळा फाट्या जवळील चंद्रोदय पेट्रोल पंपावर दोघांनी २ हजार लिटर 1 लाख 83 हजार 330 रुपये किमतीचे डिझेल ट्रॅक्टर मध्ये पैसे न दिल्याने फसवणूक केलेली असल्याची घटना तीन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याजवळील चंद्रोदय पेट्रोल पंपावर 3 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाऱ्याच्या सुमारास मोबाईल क्रमांक 9668137992 वरील गोविंद नावाचा अनोळखी इसम पूर्ण नाव माहित नाही तसेच विजय पाटील राहणार भोकरी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या दोघांनी संगणमताने पंपावरील मॅनेजर संदीप चौधरी यांना फोन करून तसेच विजय पाटील यांनी त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करून स्वतःच्या नावाने बिल तयार करून घेऊन 2000 लिटर डिझेल घेतले परंतु आजपर्यंत पैसे न दिल्याने फसवणूक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी चंद्रोदय पेट्रोल पंपाचे मालक हरिश्चंद्र सखाराम देशमुख राहणार कानळदा तालुका जिल्हा जळगाव यांचे फिर्यादीवरून गोविंद नावाचा अनोळखी इसम संपूर्ण नाव माहित नाही व विजय पाटील राहणार भोकरी तालुका मुक्ताईनगर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे का अशोक जाधव करीत आहे.