![]() |
मुक्ताईनगर येथील पोलिस विभागातर्फे सायबर क्राईम बाबत जनजागृती |
संदीप जोगी / मुक्ताईनगर ....... डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच नागरिकांना सावध करण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर पोलिस विभागाच्या वतीने सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उप विभागीय पुलिस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर क्राईम बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला,यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना ऑनलाईन फसवणूक, OTP, बँक खात्याची KYC बाबत माहिती, सोशल मीडियावरील फसवे लिंक, लॉटरीच्या आमिषाने होणारी फसवणूक यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच अज्ञात व्यक्तींकडून आलेल्या फोन कॉल्स व मेसेजवर विश्वास ठेवू नये,व कोणताही सायबर गुन्हा झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी “आपली जागरूकता हाच सायबर गुन्हेगारांवरचा सर्वात मोठा बचाव” असा संदेश देत नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमात मागील आठवड्याभरात मुक्ताईनगर तालुक्यात दरोडे ,चोऱ्या, लुटमार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून सात ते आठ सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले, व आरोपी कडून मोबाईल जप्त केले व सदर हस्तगत केलेले सर्व मोबाईल मुळ मालकाला परत देण्यात आले,
यावेळी मुक्ताईनगर चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ , गोपनीय विभागाचे हवालदार रवी धनगर हे उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले. तसेच प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन व महिला नियंत्रण शाखा मुक्ताईनगर तर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, तालुका सचिव हकीम चौधरी, राजेश वानखेडे, धनंजय सापधारे, समाधान पाटील, रामदास सुतार, आदींच्या हस्ते उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी सर्व पोलीस पाटील, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन मेढे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी मानले.