![]() |
मुक्ताईनगरच्या हिमांशू भालशंकर याची मैदानी स्पर्धेत विभाग स्तरावर निवड |
संदीप जोगी मुक्ताईनगर.....मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी हिमांशू प्रशांत भालशंकर याने पाचोरा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर व दोनशे मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला .त्याची विभाग स्तरावर निवड करण्यात आली. त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. संतोष कुमार टावरी, कोषाध्यक्ष वसंत तळेले, सचिव डॉ. रवींद्र पाटील, संचालक नारायण चौधरी ,बाळकृष्ण राणे ,मुख्याध्यापक नितीन पवार, मुख्याध्यापिका सरला पाटील, पर्यवेक्षिका लीना रडे, क्रीडा शिक्षक मनीष चौधरी संजय राणे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.