सोहळा मैत्रीचा — उजाळा आठवणींचा कुऱ्हा येथे २००४-०५ च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

Viral news live
By -
0

सोहळा मैत्रीचा — उजाळा आठवणींचा कुऱ्हा येथे २००४-०५ च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) — शैक्षणिक क्षेत्रात आपले मौलिक योगदान देणाऱ्या शिवाजी हायस्कूल कुऱ्हास्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुऱ्हा या शाळांतील शैक्षणिक वर्ष २००४-२००५ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येत “सोहळा मैत्रीचा — उजाळा आठवणींचा” या नावाने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा मेळावा शिवाजी हायस्कूल कुऱ्हा येथे संपन्न झाला. २००४-०५ बॅचमधील सुमारे ३० विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध ठिकाणांहून खास या प्रसंगी उपस्थित राहिले. शाळेतील शिक्षकांकडून मिळालेले गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि प्रोत्साहन यांच्या बळावर या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज शासकीय, खाजगी व राजकीय क्षेत्रात उच्चपदांवर कार्यरत आहेत, तर काही जण व्यापार आणि उद्योग क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करीत आहेत.

कार्यक्रमाला सैयद खुदबुद्दीन, विशाल खोडके, महादेव पाटील, अलीम खान, अमित निबाळकर, अमित गव्हाळे, निलेश बनकर, किशोर झाल्टे, जया भोईटे, वर्षा केणे, संध्या जाधव, योगिता कपले, रुपाली सुस्ते, सीमा पवार, ज्योती ढोले, अर्चना धाडे, उषा जावरे, वैशाली चोपडे आदींसह कुऱ्हा येथील स्थायिक विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला अनिल गवई आणि रुपेश धाडे यांनीही धावती भेट देत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे वातावरण आठवणींनी भारलेले होते आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याच्या निर्धाराने सोहळ्याचा समारोप केला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !