![]() |
नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत स्वागत |
जळगाव अतिक खान:
जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव शहर व जिल्हा शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. घुगे यांना ऑक्टोबर २०२५ महिन्याचा मानसिक आरोग्य विशेषांक असलेला ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके’चा अंक तसेच वार्षिक कार्य अहवाल सप्रेम भेट देण्यात आला.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचा परिचय करून देत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संवादादरम्यान जिल्हाधिकारी घुगे यांनी चंद्रपूर व ठाणे येथे असताना तेथील समिती कार्यकर्त्यांशी झालेल्या संपर्काबाबत सांगितले आणि समितीच्या जनजागृतीमूलक कामाचे कौतुक केले.
या वेळी राज्य सहकार्यवाह विश्वजीत चौधरी, मानसिक आरोग्य विभाग जिल्हा कार्यवाह मिनाक्षी चौधरी, शहर कार्याध्यक्ष प्राचार्य आनंद ढिवरे, तसेच विलिनी चौधरी उपस्थित होते.