![]() |
खोट्या सचिव कडून जि प उर्दू शाळा बोराखेडी ची खोटी तक्रार |
मोताळा-मोताळा शहरात जवाहर उर्दू हायस्कूल हि शाळा असून सदर ची शाळा ज्या संस्थे द्वारा चालविली जात त्या संस्थ चे संचालक मंडळ ला धर्मदाय आयुक्त बुलढाणा कडून मान्यता नसताना ए जी शेख नामक व्यक्ती स्वतः ला सचिव पत्नीला अध्यक्ष म्हणून घेतो व असे खोटे लेटरहेड तयार करून खोट्या तक्रारी करतों
अशीच एक तक्रार दिनांक ०९/०७/२०२५ रोजी सदर च्या इसमान मा सी ई ओ साहेब जि प बुलढाणा यांच्या कडे जि प उर्दू शाळा बोराखेडी ची केली असून त्या तक्रारीत त्यानी शाळेची बदनामी होईल असे खोटे आरोप केले असून या पूर्वी हि सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने अशीच तक्रार केली त्या वेळेस वरिष्ठ कार्यालय कडून चौकशी झाली आणि त्या तक्रारीत कोणतेच तथ्य सापडले नाही तीच तक्रार त्यांनी परत केली असून त्याची हि चौकशी झाली असून खोटा सचिव खोटाच सिद्ध झाला त्यानी आपल्या तक्रारीत भौतिक सुविधा चा; शिक्षकाच्या शिक्षणाचा; मैदानाचा, प्रयोगशाळा मुद्दा मांडून जवाहर उर्दू हाय-स्कूल मोताळा च्या पटावर च्या परिणाम चा उल्लेख केला
या सर्व बाबी ज्या वेळेस शाळा व्यवस्थापन समिती बोराखेडी उर्दू यांच्या लक्षात आल्या त्यांनी वरील सर्व बाबींचा मुद्देसूद उत्तर लिहून मा मुख्यकार्यकरी अधिकारी साहेब बुलडाणा यांना शाळेची बदनामी होत असल्याने आपण जिल्हा परिषद कुटुंब प्रमुख या नात्यानं बदनामी करनाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करावा किंवा शाळा व्यवस्थापन समिती बोराखेडी उर्दू ला गुन्हा नोंद करण्याचा परवानगी दयावी किंवा कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सुध्दा या पत्रकात देण्यात आला या पत्रकावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौं. आ. जाफर पटेल उपाध्यक्ष सौं. रु.अहमद शेख ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोहम्मद आरिफ मोहम्मद रऊफ, फिरोज खान अजमततुल्लाह खान, मोहम्मद अतीक मोहम्मद फरीद, रिजवान खान रफीक खान, माजी ग्रामपंचायत सदस्य सै मुबीन सै कासम माजी ग्रामपंचायत सदस्या समीना बी फिरोज खान व इतर पालकाच्या स्वाक्षरी आहेत