केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपा सह अन्य दोन पेट्रोल पंप वरील दरोडा टाकणारे सहा आरोपी अटकेत.

Viral news live
By -
0

आरोपींना 20 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.
संदीप जोगी मुक्ताईनगर....

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आव्हान देणारी आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि वरणगाव शिवारातील तीन पेट्रोल पंपांवर गेल्या आठवड्यात शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे, मुक्ताईनगर येथील हा पेट्रोल पंप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. या सशस्त्र दरोड्याप्रकरणी जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले असून, त्यांनी आता सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्यांचाही समावेश आहे.

दिनांक 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर येथील रक्षा ऑटो  फ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंप अशा तीन ठिकाणी बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी रोख रकमेसह मोबाईल आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआरही चोरून नेले होते. या तिन्ही घटनांमधून चोरट्यांनी 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने एक विशेष तपास पथक तयार केले आणि तपास सुरू केला.

पोलिस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर तपास करत नाशिक आणि अकोला येथे छापे टाकले आणि या दरोडेखोरांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन अरविंद भालेराव राहणार भुसावळ हल्ली मुक्काम खकणार जिल्हा बऱ्हाणपूर, पंकज मोहन गायकवाड राहणार वेडी माता मंदिर जुना सातारा रोड भुसावळ,  हर्षल अनिल बावस्कर राहणार बाळापुर जिल्हा अकोला  व देवेंद्र अनिल बावस्कर राहणार बाळापुर जिल्हा अकोला,  प्रदुम्न दिनेश विरघट राहणार श्रद्धा नगर अकोला आणि एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.  सर्व आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सर्वांना बुधवारी न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 20 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात  आलेली असल्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सांगितले.

@@@ अकोला एलसीबी पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य... सदर गुन्ह्या कामी अकोला स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांनी अकोला परिसरातील गुन्हेगारांना अटक करणे कामी सहकार्य केलेले आहे.

@@ सदर गुन्ह्याचा तपास जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय अधिकारी संदीप गावित , मुक्ताईनगर डीवायएसपी सुभाष ढवळे  यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव एलसीबी चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे सह एलसीबी पथक यांनी परिश्रम घेतले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपा सह अन्य दोन पेट्रोल पंप वरील दरोडा टाकणारे सहा आरोपी अटकेत.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपा सह अन्य दोन पेट्रोल पंप वरील दरोडा टाकणारे सहा आरोपी अटकेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)