![]() |
कास्ट्राईब शिक्षक संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी -- राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे |
(अतिक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर -- आजच्या काळात नोकरी करणे तसेच नोकरी टिकवणे अतिशय कठीण बनले आहे. शासन धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट शिक्षक संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन कास्ट्राईब शिक्षक राज्य संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पालवे यांनी मुक्ताईनगर येथे केले. मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत श्री.पालवे बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष संजय निकम हे होते.
याप्रसंगी शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत संदर्भात तसेच शिक्षक / कर्मचारी बढती, शिक्षकांच्या समस्या तसेच 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणे बाबत, तसेच 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात लढा सुरू असल्याचे सांगितले. यासोबतच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करणे साठी शासन स्तरावर मागणी करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासनाचे कर्मचाऱ्यांच्या विरोधात नवनवीन येणारे जी.आर. या संदर्भात कास्ट्राईब शिक्षक राज्य संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पालवे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना ही कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सदैव लढणारी व त्यांच्या पाठीशी उभी राहणारी संघटना असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.संजय निकम यांनीही अनमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपाध्यक्ष शरद बोदडे, कार्याध्यक्ष चंद्रमणी इंगळे, उपाध्यक्ष प्रा.सुशील बोदडे तसेच ज्येष्ठ सल्लागार सिद्धार्थ निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.