भालेराव रोडवरील भोपळे डि.पी ची दुरावस्था तात्काळ दुरुस्ती ची मागणी अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच शिवसेना (उबाठा) चा आमरण उपोषणाचा इशारा

Viral news live
By -
0
भालेराव रोडवरील भोपळे डि.पी ची दुरावस्था तात्काळ दुरुस्ती ची मागणी अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच शिवसेना (उबाठा) चा आमरण उपोषणाचा इशारा
भालेराव रोडवरील भोपळे डि.पी ची दुरावस्था तात्काळ दुरुस्ती ची मागणी अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच शिवसेना (उबाठा) चा आमरण उपोषणाचा इशारा 

मलकापुर:- भालेगांव रोडवरील डि.पी ची दुरावस्था झाली असून या भागातील वायरमन शेतकऱ्यांशी अरेरावी करीत असल्याने पंधरा - पंधरा दिवस विद्युत पुरवठा खंडीत ठेवून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके सुकत असल्याने याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना दिली उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास सह आदि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता आर जी तायडे यांना निवेदनाद्वारे त्या डि.पी चे काम तात्काळ सुरू करा अन्यथा म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे आहे की, भालेगाव रोडवरील भोपळे डि.पी वरील वायरमन अजय भोईटे काही शेतकऱ्यांना हाताशी विद्युत पुरवठा खंडित राहावा या हेतूने आम्हा खालील शेतकऱ्यांना विजेची गरज असताना झंपर बंद करून ठेवतात व त्यांच्या मर्जीनुसार शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असल्यास झंपर सुरू करतात त्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे आमचे पीकांचे अतोनात नुकसान होत आहे आम्ही त्यांना विद्युत पुरवठा सुरू करण्यास सांगितले असतात तुम्ही दुसऱ्या वायरमनला पैसे द्या व त्याच्याकडूनच लाईट सुरू करून घ्या मला फोन करू नका मी तुमच्याकडील विद्युत पुरवठा चालू करणार नाही कोणत्याही अधिकाऱ्याकडे गेल्यास माझं कोणीच काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात,चार वर्षापासून सदरील परिसरातील इलेक्ट्रिक खांबा झुकलेल्या अवस्थेत आहे सदर खांबा एखाद्या वेळी जमिनीवर पडल्यास इलेक्ट्रिक शॉटसर्किट ने शेतकरी,गुराढोरांची जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.भोपळे डीपी वरून शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळण्याकरीता कर्तव्यदक्ष वायरमन ची नियुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अन्यथा लोकशाही मार्गाने म.रा.वि.वि कंपनी कार्यालयातच आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे, निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर , शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी,सै. वसीम सै रहीम अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख, सुनील पुंजाजी वानखेडे,कासमखाॅ हुसेन खाँ,शेख सरदार शेख सत्तार, मुन्सीफ खान शारीख उल्लाखान, शेख कलीम शेख अमजद, किसन पाटील,हफीजखान बिसमिलाॅ खान, मुस्तफाखान मुसाखान,सै.अलयार सै.सुलतान,जाकीरशाह इमाम शाह,हसन गौरी,सै.तौफीक,शे.मोबीन सह आदिंची उपस्थिती होती.
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)