![]() |
मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी परिसरात महसूल विभागाने पकडले दोन डंपर व एक जेसीबी बुधवारी पहाटे पावणेचार वाजता केली कारवाई |
संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली भागातील भोकरी परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांना मिळाली होती.
तालुक्यातील भोकरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची अवैधरित्या उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार गिरीश वखारे यांच्यासह नायब तहसीलदार निकेतन वाडे , मंडळ अधिकारी धनराज मुंडे ,तलाठी निलेश काळे ,तलाठी नितीन उपराटे ,तलाठी किशोर खरात ,तलाठी अमित इंगळे, तलाठी वैभव काकडे, तलाठी विलास गायकी ,तलाठी विशाल जाधव, महसूल कर्मचारी पंकज टोलमारे यांनी स्वतः 15 ऑक्टोंबर सोमवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास छापा टाकून त्या ठिकाणावरून दोन डंपर व एक जेसीबी मशीन ताब्यात घेतले. प्रसंगी अंतुरली आऊट पोस्टचे हवालदार लीलाधर भोई तसेच पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. ताब्यात घेतलेली वाहने अंतुरली आऊट पोस्ट पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली असल्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी सांगितले.
एक डंपर व जेसीबी विजय दिनकर पाटील राहणार भोकरी तालुका मुक्ताईनगर यांच्या मालकीचे असून दुसरे डंपर वर नंबर नसल्याने त्याचे आरसी बुक महसूल विभागाने मागितले असल्याचे सांगण्यात आले.