 |
उपशिक्षणाधिकारी यांचा सत्कार करताना उच्च श्रेणी मुख्याध्यापक तौसीफ सिद्दीकी , शिक्षक वृंद |
 |
गावाचे सुपुत्र यांचा सत्कार करताना शाळा व्यवस्थापन समिती , पंच कमिटी किन्होळा |
किन्होळा गावाचे सुपुत्र यांची बुलडाणा प्राथमिक उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळा पार पडला
जि प उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा किन्होळा व पंचकमिटी यांच्याकडून गावाचे सुपुत्र नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी प्राथमिक शेख अकील शेख इब्राहिम यांचे स्वागत करण्यात आले त्यानिमित्ताने स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला, तसेच सिरतच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींचे शील्ड देऊन स्वागत करण्यात आले, उच्च श्रेणी मुख्याध्यापक तौसिफ सिद्दिकी यांनी शाळेची पूर्ण परिस्थिती समोर ठेवली व रिक्त असलेल्या विषय शिक्षक भाषा व गणित पदांचा खुलासा करून दिला. यासीन सर यांनी शेर शायरी ने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोसिन भाई, उपाध्यक्ष जमीर भाई, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य सलीम टेलर , अहमद टेलर , अमान ठेकेदार हजर होते तसेच, पंच कमिटी किन्होळा अध्यक्ष ताहेर भाई , माजी उपसरपंच अशरफ भाई , अन्सार भाई, युनुस मामू , युसुफ सर , आर डी पठाण सर, व मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होते.