![]() |
समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय – अमोल खलसे मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न |
संदीप जोगी... मुक्ताईनगर Viral News Live
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुक्ताईनगर उपखंडाचा विजयादशमी उत्सव मुक्ताईनगर येथे रविवार संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते व जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख अमोल खलसे यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भाऊराव महाराज पाटील , तालुका संघचालक डॉ मनोज महाजन उपस्थित होते.
उत्सवाची सुरुवात स्वयंसेवकांच्या पंथसंचलनाने करण्यात आली, गोदावरी मंगल कार्यालय-आनंद ट्रेडर्स- तहसील रोड-ट्रेझरी ऑफिस-इस्कॉन मंदिर-बोदवड रोड- बस स्टँड-परिवर्तन चौक यामार्गे संघाचे सघोष व शिस्तबद्ध पथसंचलन झाले व उत्सवाचा समारोप गोदावरी मंगल कार्यालय या ठिकाणी झाला. सुरुवातीस पारंपारिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले, त्यानंतर शाखेतील स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.
यावेळी मोठ्या संख्येने उपखंडातील गणवेशधारी स्वंयसेवक व महिला,नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका संघचालक डॉ मनोज महाजन यांनी तर सूत्रसंचालन तालुका सहकार्यवाह राजेश पाटील यांनी केले.कार्यक्रमास स्वयंसेवकांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले.