मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल मुक्ताई पॅलेस समोरील जीवघेण्या खड्ड्याला पत्रकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल मुक्ताई पॅलेस समोरील जीवघेण्या खड्ड्याला पत्रकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल मुक्ताई पॅलेस समोरील जीवघेण्या खड्ड्याला पत्रकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!


संदीप जोगी...   मुक्ताईनगर  :
मुक्ताईनगर ते भुसावळ या मुख्य मार्गावर हॉटेल मुक्ताई पॅलेस समोर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा आणि धोकादायक खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही वाहनांचे अपघात होऊन लोक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पुढाकार घेत  स्वखर्चाने तो  जीवघेणा खड्डा मंगळवारी बुजवला.  सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर कार्यालयाने याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निष्काळजीपणामुळे त्रस्त झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतःच्या खर्चाने हा जीवघेणा खड्डा भरून टाकला. या कृतीद्वारे पत्रकारांनी केवळ रस्त्यावरील अडथळा दूर केला नाही, तर प्रशासनाच्या बेफिकीरीला आरसा दाखवत मानवतेचा खरा अर्थ समजावून दिला.

पत्रकारांनी एकत्र येऊन खड्डा बुजवताना त्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि “या खड्ड्यामुळे अनेकांना इजा झाली, म्हणून आता त्याच खड्ड्याला कायमचा निरोप देत आहोत” अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी पत्रकारांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत प्रशासनाने देखील अशा समस्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर कार्यालयाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)