![]() |
आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाची बैठक वरळी डोम, NSCI येथे उत्साहात पार पडली. |
बैठकीत अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांबाबत, शिक्षण व रोजगाराच्या संधी, सामाजिक न्याय, तसेच संघटन बळकटीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलत आहे.
अल्पसंख्याक विभागाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने विविध संघटनात्मक व सामाजिक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले, तसेच सर्वांच्या साथीने, एकजुटीने आणि निष्ठेने पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला.
अल्पसंख्यांक विभाग केवळ मुस्लिम बांधवांसाठी नव्हे, तर केंद्र शासनाच्या परिभाषेनुसार जैन, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या सर्व अल्पसंख्यांक समाजांच्या हितासाठी कार्य करेल अशी ग्वाही दिली.
यावेळी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा.श्री.नवाब मलिक साहेब, पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.ऍड.सय्यद जलालुद्दीन साहेब,आमदार मा.सना मलिक, आमदार मा.श्री.इद्रिसभाई नाईकवाडी,मा.आ.श्री.जिशान सिद्दिकी, अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक मा.श्री. नजीबभाई मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मा.श्री.इरफान अली शेख यांनी तर आभार मा.श्री.शाहआलम खान यांनी केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मा.श्री.लतिफभाई तांबोळी, तसेच अल्पसंख्याक आयोगाचे मा.सदस्य, पॅरेंट बॉडीचे प्रदेश पदाधिकारी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.