![]() |
|
10,41,340/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत – स्था.गु.शा.ची मोठी कामगिरी
बुलढाणा जिल्ह्यातील पो.स्टे. हिवरखेड हद्दीत हातचलाखी व फसवणूक करून सोने लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण 10,41,340/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी फरार आहे.
घटनेची हकीकत
दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादी परशुराम लक्ष्मण कांडेलकर, रा. बोथा कोळी, ता. खामगाव यांनी पो.स्टे. हिवरखेड येथे तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार, दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी आरोपींनी फिर्यादीशी परिचय करून, त्याच्या मुलाचा हात पाहून मुलाचे जीवावर संकट असल्याचे भासवले. संकट टाळण्यासाठी विशेष पूजा करण्याचा बहाणा केला. फिर्यादीने भीतीपोटी पूजा मान्य केली. या वेळी आरोपींनी संगणमत करून घरात होमहवन केले व पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र (2.5 ग्रॅम, किंमत 21,000/- रुपये) पूजा थाळीत ठेवण्यास सांगून, हातचलाखीने लंपास केले. शिवाय पुजेच्या नावाखाली 5,000/- रुपये दक्षणा घेतली.
तक्रारीवरून पो.स्टे. हिवरखेड येथे अप.क्र. 216/2025 भा.दं.सं. कलम 316(2), 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करून तीन आरोपींचा सहभाग उघड केला. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींची माहिती
- सुनिल उदयभान मुसळे (वय 39 वर्षे), रा. खांडवा, ता. मोताळा, जि. बुलढाणा
- संदिप उत्तम महापुरे (वय 38 वर्षे), रा. खांडवा, ता. मोताळा, जि. बुलढाणा
जप्त मुद्देमाल
- सोन्याची पट्टी (वजन 2.5 ग्रॅम)
- गुन्ह्यात वापरलेली ब्रेझा कार – 01 नग
- मोबाईल – 02 नग
एकूण किंमत – 10,41,340/- रुपये
तपासाची दिशा
दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे. हिवरखेडच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरीत एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पो.स्टे. हिवरखेड करीत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कामगिरी मा. श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या आदेशाने तसेच श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, पोना. विजय वारुळे, पोकॉ. मंगेश सनगाळे, राजेश गडकर, सतीश नाटेकर, चापोहेकॉ. समाधान टेकाळे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) तसेच पो.हे.कॉ. राजू आडवे, पोकॉ. कैलास ठोंबरे (तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा) यांचा समावेश होता.