अंबाजोगाईत ओबीसी व बलुतेदार-अलुतेदार चिंतन परिषद उत्साहात पार

Viral news live
By -
0
अंबाजोगाईत ओबीसी व बलुतेदार-अलुतेदार चिंतन परिषद उत्साहात पार
अंबाजोगाईत ओबीसी व बलुतेदार-अलुतेदार चिंतन परिषद उत्साहात पार

आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध समाज नेत्यांचा सहभाग

(अतिक खान)

विभागीय संपादक

अंबाजोगाई (जि. बीड) — दिनाक 12 ऑक्टोबर 2025 रोजी अंबाजोगाई येथे ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार चिंतन परिषद आमदार श्री संजयजी केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

या परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय बलुतेदार विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच बेलदार समाज प्रदेशाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जानकिरामजी पांडे उपस्थित होते. त्यांच्यासह शशिकांत आमने, आयोजक भीमराव दळे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हेही उपस्थित होते.

या प्रसंगी संत गाडगेबाबा यांचे वंशज श्री. प्रविणराव जाणोरकर आणि साहितरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्री. सचिन साठे साहेब यांची उपस्थिती विशेष ठरली.

कार्यक्रमास प्रशांत डोरले, माधवराव शेटे, कलीम जहांगीर, भूमन्ना अक्क्केवाड, बालाजी शिंगे, संजय जोरले, अरुण भालेकर यांच्यासह विविध बलूतेदार व ओबीसी समाजाचे नेते, पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चिंतन परिषदेच्या माध्यमातून ओबीसी व बलुतेदार समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)