![]() |
मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रातील महिलांची आरक्षण सोडत सोमवारी. |
संदीप जोगी मुक्ताईनगर...
आगामी होऊ घातलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू असून. मुक्ताईनगर तालुक्यात नव्याने जिल्हा परिषदेचे ३ गट व पंचायत समितीचे ६ गण निर्मित झालेले आहे. जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रमा नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण यामधून महिला उमेदवार यांच्या जागा निश्चित करावयाच्या असून यासाठी 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये दुपारी १२ वाजता सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने 13 ऑक्टोंबर सोमवार रोजी तहसील कार्यालयामध्ये विशेष सभा आयोजित केली आहे.